केळी खाण्याचे अनेक फायदे

                               केळी

केळीमध्ये खनिजद्रव्ये विपुल प्रमाणात असल्याने तसेच कॅल्शिअम व मॅग्नेशिअम चे प्रमाण फॉस्फरस पेक्षा जास्त असल्याने पोषक घटकांचे दृष्टीने खेळ हे मौल्यवान  गुणकारी फळ होय.मुलांच्या शरीराच्या विकासासाठी केळीतील कॅल्शिअम व फॉस्फरस घटक अत्यंत उपयुक्त असतात. केळांच्या सेवनाने मुलांचे शरीर फिकट पडत नाही. केळीमध्ये रक्तवाढीसाठी लागणारे लोह, तांबे, मॅगनीज असते. केळ्यातील लोह रक्तास लाल व शुद्ध ठेवते. केळात ए, बी,डी,जी,इ.व एच ही जीवनसत्वे पुष्कळ प्रमाणात तसेच क्लोरीन, पोटॅशियम, सोडियम, गंधक, सिल्का सारखी अत्यंत उपयोगी व पौष्टिक खनिज पदार्थ असतात. ज्यांना केळी पचत नाहीत अशांनी केळी खाऊ नये. तसेच केळी खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिल्याने सर्दी होते. त्यामुळे लगेच पाणी पिऊ नये.केळी आतड्यात अन्न कुजण्याच्या प्रक्रियेस प्रतिबंध करतात. त्यामुळे आतड्यांचे रोग होत नाहीत.केळी संध्याकाळी खाल्याने त्याची किंमत सोने इतकी असते

Comments