Posts

Showing posts from June, 2020

हृदयविकार

Image
                            हृदयविकार         रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने श्वास अडकल्या सारखा होतो. छातीत कळ येते व ते खांद्यापर्यंत जाते. छातीत धडधडते, चक्कर येते, मानसिक अस्वस्थता वाढते, खूप घाम येतो, थकवा जाणवतो. उपचार:- १) काही दिवस द्राक्षषे खाल्ल्याने किंवा त्याचा रस पिल्याने हृदयविकार नियंत्रणात येतो. २) रोज एक सफरचंद व एक मध्यम आकाराचा आवळा खावा. ३) कच्च्या कांद्याचा रस एक चमचा प्यावा. ४) जेवणानंतर रोज एक चमचा मध खावा त्यामुळे हृदयाची स्थिती सुधारून रक्ताभिसरण चांगले होते व हृदयातील वेदना व धडधड कमी होते. ५) हिरव्या पालेभाज्या कोबी, संत्री, मोसंबी, लिंबूू यांचे सेवन करावे. पथ्य:- आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे. मैद्याचे पदार्थ, मिठाई, शीतपेये, मांसाहारी पदार्थ, लोणी, साय टाळावी. चहा, कॉफी, मद्य, तंबाखू वर्ज करावा.

मूत्रकच्छ

Image
                                     मूत्रकच्छ      थेंब थेंब लघवी होऊन वेदना होतात किंवाा उन्हाळी लागते. उपचार:- १) गूळ घालून ताक पिणे               २) गायीच्या गरम दुधात तूप, साखर किंवा गूळ                           घालून पिणे.

दमा

Image
                                दमा उपचार:- १) भोपळ्याच्या मुळाचे चूर्ण व सुंठ दिवसातून अर्धा अर्धा चमचा दोन ते तीन वेळा दीर्घकाळपर्यंत घेतल्याने दमा नाहीसा होतो. २) अंघोळीच्या वेळी अंगावर पाणी घेण्यापूर्वी तोंडात दोन घोट पाणी भरून घ्यावे. व आंघोळ पूर्ण होईपर्यंत तसेच ठेवावे. अंघोळ पूर्ण झालेवर थुंकावे. ३) एक वर्षापूर्वीचा जुना मध एक कप पाण्यात किंवा दुधात मिसळून प्यावा. मधामध्ये फुफ्फुसांच्या आवरणातील दोष कमी होऊन चिकट पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया थांबते. ४) एक पेला लिंबूपाणी जेवणाबरोबर प्यायल्याने दम्याची तीव्रता कमी होते. ५) एक चमचा ओवा पेलाभर ताकात मिसळून दिवसातून 22 असे ताक प्यावे. दाटलेला कफ बाहेर पडतो. ६) नुकताच सुरू झालेल्या दम्यासाठी दहा चमचे दुधात लसणीच्या पाकळ्या घालून उकळावे. व रोज एकदा प्यावे. ७) दम्याची उबळ आल्यास मोहरीच्या तेलात दोन-तीन खापराचे तुकडे घालून ते मिश्रण छातीस चोळल्याने छातीतील कफ सुटतो. रोग्याला श्वासोच्छवासाचा त्रास होत नाही. ८) मीठ वर्ज केल्याने दमा दूर होतो. पथ्य:- भात, साखर,...

मधुमेह

Image
                              मधुमेह अनियंत्रित खाणे व लठ्ठपणा या कारणामुळे मधुमेह होतो.           लक्षणे-  दिवसा गुंगी येणे, रात्री झोप न लागणे, पोटऱ्या दुखणे, सारखी भूक लागणे, सारखी लघवी लागणे इ उपचार:- १) गव्हाचा तृणरस रोज घ्यावा. २) अनुशापोटी चार तेेेे पाच कारल्याचा रस प्यावा. तसेच कारल्याचेे तुकडे पाण्यात उकळून त्याचा काढा करून प्यावा. ३) एक चमचा आवळ्याचा रस व एक कप कारल्याचाा रस एकत्र करून दोन महिने रस प्यावा. इन्सुलिन स्त्रवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. ४) जांभळाच्या बिया वाळवून त्याची पूड एक चमचा दिवसातून दोनदा एक कप दुधातून किंवा पाण्यातून घ्यावी. ५) 25 ग्रॅम ते 100 ग्रॅम मेथ्या चावून खाव्यात. ६) हरभरे भिजत घातलेले पाणी पिल्याने रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत सुधारणा होते. आहार:- नैसर्गिक रूपातील पदार्थ आहारात जास्त असावेत. फळे, सुकामेवा, भाज्या, दूध, दही, ताक हे पदार्थ भरपूर खावेत.

रातांधळेपणा

Image
                            रातांधळेपणा             उपचार:- १) सकाळ-संध्याकाळ टोमॅटो रसाचे सेवनाने रातांधळेपणात फायदा होतो. दृष्टी स्वच्छ होऊन दृष्टीचे तेज वाढते. २) बकरीच्या दुधात लवंग उगळून डोळ्यात घातल्याने रातांधळेपणा दूर होतो. ३) पांढरे मिरे दहीत किंवा मधात खलून सकाळ-संध्याकाळ डोळ्यात घातल्याने रातांधळेपणा दूर होतो. ४) कांद्याच्या रसात थोडे मीठ घालून त्याचे थेंब डोळ्यात घातल्याने रातांधळेपणा बरा होतो.

मुळव्याध मोडावर

Image
                            मुळव्याध मोडावर उपचार:- १) कारल्याच्या मुळीचा लेप लावावा. २) सोलून ठेचलेला कांदा भाजून लावावा. ३) मुळा दूध घालून बारीक वाटावा व मूळव्याधीच्या दुखऱ्या सुजलेल्या भागावर लावावा.

रक्ती मूळव्याध

Image
                            रक्ती मूळव्याध         उपचार:- १) धने व खडीसाखरेचे पाणी उकळून तो काढा पिल्याने मूळव्याधीतून पडणारे रक्त बंद होते. २) एक कप गाजराचा रस व एक कप गायीचे दूध अनुशापोटी घ्यावे. ३) रात्री थोड्या दह्यात तीन-चार आमसुले घालून सकाळी त्या दह्याचे ताक करून प्यावे. ४) कांदा जास्त पाण्यात वाटून त्यात साखर घालून हे मिश्रण दिवसातून दोनदा प्यावे. ५) जिरे वाटून त्याचा लगदा करून बांधल्याने मोडातून पडणारे रक्त बंद होते. दाह थांबतो तसेच बाहेर आलेला व खूप दुखत असणारा मोड आत जातो.

मुळव्याध

Image
                                मुळव्याध       जुनाट बद्धकोष्टता व आतड्यातील बिघाड यामुळे मुळव्याध होतो. उपचार:- १) रोज एक ग्लास ताक सुंठ पुड घालून प्यावे. २) 100 ग्रॅम किसलेला मुळा व एक चमचा मध एकत्र करून दिवसातून दोनदा हे मिश्रण खावे. ३) जांभळाच्या हंगामात रोज मीठ लावून जांभळे खावीत. त्यामुळे मूळव्याध कायमची बरी होऊन त्याला आयुष्यभर त्रास होत नाही.४) तीन कप पाण्यात वीस ग्रॅम तीळ घालून ते पाणी उकळून एक कप  करावे व त्यात लोणी घालून रोग्याला खायला द्यावे. ५) तुळस बी चूर्ण दहा ग्रॅम पाण्याबरोबर सकाळ-संध्याकाळ घ्यावे.

मुतखडा

Image
                                मुतखडा                  मुतखडा शरीरातील 'अ' जीवनसत्वाच्या अभाव व गरजेपेक्षा अधिक प्रमाणात 'ड' जीवनसत्व पोटात जाणे तसेच पाणी किंवा इतर द्रव्य पदार्थ कमी प्यायल्याने मूतखडे होतात.       लक्षणे:- पाठ, ओटीपोट, वृषण मांड्या याा ठिकाणी तीव्र वेदना होतात. सतत लघवी ची इच्छा होते. लघवी करतानाा दुखणे तसेच लघवी थोडी थोडी होते. मळमळ, उलट्या, घाम येणे, अंग गार पडणे, लक्षणे दिसू लागतात.         उपचार:-  १) एका लिंबाच्या रसात थोडे सैंधव (खाणीतील मीठ) घालून बरेच दिवस नियमितपणे पिल्याने मुतखडा विरघळून जातो. २) रोज किमान चार लिटर पाणी प्यावे त्यामुळे क्षार एकत्र साचून त्याचे खडे होत नाहीत. ३) रोज तुळशीच्या पानांचा रस एक चमचा व तेवढाच मध एकत्र करून सहा महिने रोज प्यावा. मुतखडा आपोआप पडून जातो. मुत्राशयाचेे ताकत तुळशीमुळे वाढते. ४) शेवग्याच्या मुळांच्या काढ्यात सोडा घालूून प्यावा किंवा नुसता काढा घेतल्यानेही मुतख...

त्रिदोषनाशक पदार्थ

                  त्रिदोषनाशक पदार्थ          गाईचे तूप, गुळ, कुळीथ, जीरे, लवंग, जायपत्री, लिंबू (आंबट), मुळा, व मुळ्याच्या शेंगा, डिंगऱ्या, शेवग्याच्या शेंगा, तांदुळाचा भाजी, काळी द्राक्षे, डाळिंब, काजू.           

वायु (वात) नाशक पदार्थ

                    वायु (वात) नाशक पदार्थ           गहू, तांदूळ, ज्वारी, दूध, दही, ताक, गाईचे लोणी, तूप, गुळ, बडीशेप, कुळीथ, जिरेे, हिंग, लसूण, मेथी, ओवा, आलेेेे, सुंठ, काळे, मिरे, लवंग, दालचिनी, लिंबू, वांगी, कारली, तांबडा भोपळा, कांदा, गाजर, मुळा, शेवगा, मनुका, आवळा, टोमॅटो, सफरचंद, संत्रे, आंबा, बदाम, पिस्ता, चारोळी, काजू इ.

वायु (वात) कारक पदार्थ

                      वायु (वात) कारक पदार्थ      बाजरी, म्हशीचे लोणी, मटकी, चवळी, मसूर, हरभरा, वाटाणा, दुधीभोपळा, काकडी, दोडका, बटाटा, रताळे, कोबी, भेंडी, गवार, पालक, द्राक्ष, खजूर, चिक्कू, सीताफळ, कच्चा आंबा, पपई इ.

पित्तनाशक पदार्थ

                        पित्तनाशक पदार्थ         गहू, तांदूळ, ज्वारी, दूध, म्हशीचे व गाईचे दही, लोणी, तूप, एरंडेल तेल, साखर, जुना मध, मूग, मटकी, मसूर, हरभरा, वाटाणे, धने, जिरे, मोहरी, लवंग, आमसूल (कोकम), दुधी भोपळा, दोडका, रताळे, कोबी, मुळा, पालक, खजूर, आवळा, अंजीर, केळी, पेरू, सीताफळ, बोर, चिकू, सफरचंद, डाळिंब, पिकलेला आंबा, बदाम, चारोळी, काजू इ.

पित्तकारक पदार्थ

                    पित्तकारक पदार्थ       बाजरी, ताक, चहा, कॉफी, सोडा, लेमन, तंबाखू, मेथी, मेथीची भाजी, आले, सुंठ, काळी मिरी, दालचिनी, जायफळ, पिकलेली चिंच, कारली, पांढरा कांदा, गाजर, द्राक्ष, पिकलेले टोमॅटो, संत्रे, कच्चा आंबा, पिस्ता, लसुण, चवळी, उडीद, बडीशेप इ.