दररोज सफरचंद खाण्याचे फायदे

                              सफरचंद
    रोज एक सफरचंद खा डॉक्टरला दूर ठेवा.तसेच झोपण्यापूर्वी जर सफरचंद खाण्यात आले तर डॉक्टर नुसता हात चोळत बसेल म्हणजेच आपणास कोणतेही आजार होणार नाहीत.अशा तऱ्हेने इंग्रजीत सफरचंदाचे महत्त्व सांगितले आहे सफरचंदं पचनशक्ती वाढते तसेच रक्त शुद्ध करते. सफरचंदाचे सेवनाने हिरड्या मजबूत होतात. शरीरातील विषारी द्रव्ये दूर होतात.रक्तदाब कमी करण्यासाठी तसेच जठरातील आंबटपणा दुर करण्यासाठी सफरचंद अमृत समान आहे. झोपताना सफरचंदाचे सेवन केल्यास मेंदू शांत राहतो व झोपही शांत लागते. सफरचंदात इतर फळांपेक्षा फॉस्फरसचे प्रमाण सर्वात जास्त असते. शरीरात ते चांगल्याप्रकारे शक्ती व उष्णता पुरवते. सफरचंदात लोहाचा अंशही जास्त असतो. ते रक्त व मेंदू दुर्बल असणाऱ्यांना फायदेशीर असते. सफरचंदातील फॉस्फरस व लोह मानसिक अशांती वरील उत्तम औषध असून ज्ञानतंतू च्या व मेंदूच्या दुर्बलतेवर ते उत्तम पौष्टिक फळ होय. सफरचंदात टार्टारिक ॲसिड असल्याने ते लवकर पचते तसेच इतर खाल्लेले अन्न ही लवकरच असते

Comments