मुतखडा

                              मुतखडा
           

     मुतखडा शरीरातील 'अ' जीवनसत्वाच्या अभाव व गरजेपेक्षा अधिक प्रमाणात 'ड' जीवनसत्व पोटात जाणे तसेच पाणी किंवा इतर द्रव्य पदार्थ कमी प्यायल्याने मूतखडे होतात.
      लक्षणे:- पाठ, ओटीपोट, वृषण मांड्या याा ठिकाणी तीव्र वेदना होतात. सतत लघवी ची इच्छा होते. लघवी करतानाा दुखणे तसेच लघवी थोडी थोडी होते. मळमळ, उलट्या, घाम येणे, अंग गार पडणे, लक्षणे दिसू लागतात.
       उपचार:- १) एका लिंबाच्या रसात थोडे सैंधव (खाणीतील मीठ) घालून बरेच दिवस नियमितपणे पिल्याने मुतखडा विरघळून जातो. २) रोज किमान चार लिटर पाणी प्यावे त्यामुळे क्षार एकत्र साचून त्याचे खडे होत नाहीत. ३) रोज तुळशीच्या पानांचा रस एक चमचा व तेवढाच मध एकत्र करून सहा महिने रोज प्यावा. मुतखडा आपोआप पडून जातो. मुत्राशयाचेे ताकत तुळशीमुळे वाढते. ४) शेवग्याच्या मुळांच्या काढ्यात सोडा घालूून प्यावा किंवा नुसता काढा घेतल्यानेही मुतखडा विरघळून जातो. ५) गोखरूचे (काटेरी फळ) चूर्ण १/२ चमचा मध एकत्र करून मेंढीच्या दुधाबरोबर घेतल्याने मखडा विरघळतो. ६) मुळ्याचेे चार तोळे बी अर्धा शेर पाण्यात घालून अर्धे पाणी राहीपर्यंत उकळावे. हे पाणी पिल्याने मुतखडा नष्ट होतो.

Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

हृदयविकार