तुळशीचे लावण्याचे फायदे
तुळस
तुळशी सारखी औषधी वनस्पती पृथ्वीतलावर नाही. तुळशीजवळ तासच काय पण साप, विंचू सुद्धा फिरकत नाहीत. तुळशीच्या रोपातून एक प्रकारचा सुगंधी वायू निघतो. तो आजूबाजूच्या रोगकारक हवेचा नाश करून हवा शुद्ध करतो. रोज सकाळी तुळशीची कुंडी घरात ठेवावी, परत संध्याकाळी बाहेर ठेवावी. त्यामुळे घरातील हवा शुद्ध राहून सर्वांचे आरोग्य चांगले राहते. अनेक रोग व वायू विकार उद्भवत नाहीत. रोज तुळशीची 10 ते 15 पाने दही किंवा ताकाबरोबर खाल्ल्याने शरीरातील चरबी कमी होते. शरीर सप्रमाण होते तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढते, आजार पण येणारच नाही अशी परिस्थिती तुळस उत्पन्न करते, रक्तातील हिमोग्लोबिन वाढतात. त्यामुळे दुसरे रोग होत नाही.
तुळशीचे औषधी उपचार:-
१) आल्याचा तुकडा ठेचुन वर-खाली तुळशीची पाने ठेचून तो दुखणाऱ्या दातात दाबून धरला तर दंतशूळ बरा होतो.2) ५० ग्रॅम पाण्यात १० ग्रॅम पाने घालून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे. या काड्या ने ताप, सुस्ती, अरुची, दाह, वायु, पित्तशमन पावतात.३) तुळशीच्या रसात मीठ घालून त्याचे थेंब नाकात घातल्यास मुच्छेतून रुग्ण सावध होतो. उचकी येत असल्यास तर ती थांबते.४) सकाळी अनोशापोटी २-३ चमचे तुळशीचा रस घेतल्याने बल, तेज व स्मरणशक्ती वाढते.५) वेलची व तुळशीची पाने खाल्ल्याने उलट्या बंद होतात.६) दिवसातून ३-४ वेळा विशेषत: खाल्ल्यावर अर्ध्या तासाने तुळशीची ४-५ पाने चावून खाल्ल्यास तोंडाला दुर्गंधी येत नाही. तोंडाचे सर्वच रोग बरे होतात.७) नाकात फोड (माळीन) झाल्यास तुळशीची पाने वाळवून त्याची बारीक भुकटी तपकिरी प्रमाणे ओढावी.८) हिवाळ्यात तुळशीची ५-७ पाने ३-४ काळी मिरी व ३-४ बदाम एकत्र वाटून सेवन केल्यास हृदयास शक्ती प्राप्त होते.९) जखमेत कीड झाली असल्यास व दुर्गंधी येत असल्यास तुळशीच्या काढ्याने जखम घुवून तिच्यावर तुळशीच्या वाळलेल्या पानांचे चूर्ण लावावे.१०) तुळशीची पाने सावलीत वाळवून ती व तुरटी बारीक करून चाळून स्वच्छ बाटलीत भरून ठेवा. हे औषध जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होते ११) डंकाच्या स्थानी तुळशीची पाने व मूळ वाटून लावल्याने विंचवाचे विष उतरते.

Comments
Post a Comment