सिताफळाचे फायदे
सिताफळ
अशक्तपणा दूर होऊन अंगात शक्ती येण्यासाठी सिताफळ हे अत्यंत उपयुक्त फळ आहे. सिताफळ हे पौष्टिक, मांसवर्धक, रक्तवर्धक, बलवर्धक असल्याने अशक्त व कृश व्यक्तींना, वजन वाढत नसेल अशांना सीताफळ हे उत्तम फळ आहे. सिताफळ हृदयांच्या मांसपेशींचे बळ वाढवून हृदयाची क्रिया सामान्य बनवते. त्यामुळे ज्यांचे हृदय दुर्बल असेल हृदयाचे स्पंदन वाढत असेल व घाबरल्यासारखे वाटत असेल त्यांना सीताफळ फायदेशीर आहे. सिताफळ शरीरातील स्नायूंना पुष्ट बनवते. सीतफळ थंड असल्याने पित्त दूर करते मात्र त्याच्या अतिसेवनाने थंडी वाजून ताप येतो. आजारपण येतो.

Comments
Post a Comment