लोणी व तुपाचे फायदे

                                लोणी व तूप
             लोणी अत्यंत मृदू असते ते लहान थोरांना अमृतासमान असते. लोणी पचण्यास दुधापेक्षा हलके असून त्वरित रक्त बनविणारे आहे. लोण्याचे सेवनाने शरीर सुकुमार बनते. ते अग्निदीपक असल्याने त्याच्या सेवनाने कडकडून भूक लागते. लोण्याच्या नियमित सेवनाने चष्मा येत नाही. ताजे लोणी शितल, बुद्धिवर्धक व शरीराचा सर्वतोपरी विकास करणारे म्हणजेच शरीर पुष्ट करणार आहे. खूप दिवसांचे शिळे लोणी खाऊ नये. कारण ते उलटी, कफकारक, जड, मेद वाढवणारे, कोड निर्माण करणारे असते. सर्व प्रकारच्या लोण्यात गाईचे लोणी उत्तम होय.
                  रोजच्या जेवणात कमी-अधिक प्रमाणात तूप असणे आवश्यक आहे. तुपामुळे शरीरातील सातही धातूंची वाढ होवून शरीर बलवान बनते. त्यामुळे सर्वांगीन आरोग्यासाठी तुपाचा वापर करणे फायदेशीर ठरते. तुपामुळे वाताचे वाढलेले प्रमाण कमी होते. शरीरातील पित्ताचे प्रमाण व्यवस्था बनवते. तसेच क्षीण झालेल्या कपास पोषण मिळते. तूप अत्यंत गुणकारी असून ते मनुष्याची ज्ञानशक्ती, प्रतिभा, बळ, बुद्धी, हिंमत वाढवते. तूप दुधापेक्षा व माणसापेक्षा आठ पटीने बलप्रद आहे. खाण्यासाठी ताजे तूप अधिक गुणकारी व रुचकर असते. तुपात जखम भरून येण्याचा खास गुण असतो. भाजलेल्या जखमेवर तूप अधिक गुणकारी असते. तुपाच्या दिव्याने सूक्ष्मजंतूंचा नाश होतो. त्यामुळेच यज्ञामध्ये तुपाचा वापर केला जातो. तुपामध्ये गाईचे तूप सर्वात उत्तम होईल.एक ग्लास गरम दूध दोन चमचे तूप घालून रात्री झोपण्यापूर्वी पिल्याने सकाळी पोट चांगले साफ होते. गाईचे तूप हातापायांना चोळल्याने हातापायांची आग व शरीरातील वाढलेली उष्णता नाहीशी होते व शांत झोप लागते. तूप पचेल तेवढेच खावे जर तूप अतिरिक्त प्रमाणात खाल्ले तर फायदा ऐवजी नुकसानच होते. तूप पचले नाही तर ते हानिकारक ठरते. वृद्धांना व लहान मुलांना तसेच श्रम न करणाऱ्यांना बैठे जीवन जगणाऱ्यांना तिक तोक पचत नाही. तसेच आमदोष असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा तूप खाऊ नये किंवा अल्प प्रमाणात खावे.

Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा

हृदयविकार