कांदा खाण्याचे फायदे
कांदा
आयुर्वेदात कांदा हे उत्तम रसायन, श्रेष्ठ औषध व पौस्टीक आहार होय. कांद्यात पांढरा व लाल अशा दोन जाती आहेत. गुणवत्तेच्या दृष्टीने पांढरा कांदा उत्तम. लाल कांद्यात लोह तत्व जास्त असते. कांदा शक्तीदायक शरीर सदृढ बनविणारा व बुद्धीवर्धक मानला जातो. कांदा प्रत्येक ऋतूत सारखाच उपयुक्त असतो. तो वात, पित्त व कफ या तीन्ही विकारावर गुणकारी आहे. कांद्याच्या सेवनाने वातप्रकोप शांत होतो. दूषित पित्त मलमार्गाने बाहेर निघून जाते व नवे चांगले पित्त उत्पन्न होते तसेच कफ नाहीसा होतो. कांद्याच्या सेवनाने आतड्यांची कार्यशक्ती वाढते व शौचशुद्धी होते. कांद्यामुळे आलोचक पित्त वाढते त्यामुळे कांद्याचे सेवन रोज केल्याने डोळे सक्षम बनवतात. चमकदार व तेजस्वी दिसतात.
कांदा खाल्याने गळ्यात व तोंडात चिकटपणा राहत नाही. तोंड स्वच्छ होते, दात दुधासारखे शुभ्र राहतात.स्मरणशक्ती वाढते व दुर्बल झालेले स्नायू मजबूत बनतात. तुपात भाजलेला कांदा शिर्याबरोबर खाल्ल्याने आजारपणामुळे आलेला अशक्तपणा जाऊन शरीरात लवकर शक्ती येते. कांदा व गुळ मुलांना रोज खायला दिल्याने उंची वाढते.
आपल्याला पचेलल त्याप्रमाणात तसेच आपल्या प्रकृतीचा विचार करूनच कांदा खाल्ला पाहिजे. कांद्याचे अतिरिक्त वापराने रक्त तापुन गळवे होण्याची शक्यता वाढते. कांदा व दुधाचे एकत्र सेवन करणे. कांदा व दुधाचे सेवनात किमान तीन ते चार तासांचे अंतर ठेवावे, अन्यथा रक्तदोष कोडे इत्यादी विकार होतात. तसेच डोळे दुखत असताना कांदा सेवन केल्याने डोळे अधिक सुजतात. कांदा कापणेवर लगेच खाणे श्रेयस्कर असते अन्यथा त्यातील ऊर्ध्वगमनशील तत्व उडून जाते.

Comments
Post a Comment