लसुण खाण्याचे फायदे

                                    लसुण
               आरोग्यासाठी लसुण अत्यंत गुणकारी असल्याने त्याला अमृतासमान मानले जाते. तसेच लसणाची उत्पत्ती अमृतातूनच झाल्याचे मानले जाते. लसून हे उत्तम रसायन आहे. त्याचे सेवनाने मनुष्य निरोगी, तेजस्वी, ताकतवान व दीर्घायुष्यी होतो. जीवनसत्त्वांच्या अभावामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते, त्यांच्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर आहे. लसूण स्त्रीयांसाठी अत्यंत गुणकारी आहे. लसणातील उदयशील द्रव्य वाढलेल्या रक्तदाबावर अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्यांना लसुन हितावह आहे. तसेच लसूण मुत्रदोष निवारक व कफनिवारक असतो.
            वायुरोगावर लसणासारखे दुसरे प्रभावी औषध नाही. वायुचा नाश करण्याची शक्ती लसणात आहे वातविकारात सुद्धा लसुण उपयुक्त आहे. लसुण पौस्टीक, अस्थिभंग साधणारा, रक्तवर्धक, बलदायक, शरीराचा वर्ण उजळणारा तसेच बुद्धि व डोळ्यांसाठी हितावह आहे. लसणाच्या पाकळ्या तुपात तळून खाल्ल्यास मोडलेले हाड सांधले जाण्यास मदत होते. लसूण उष्ण असल्याने त्याचे सेवन थंडीमध्ये करावे. उन्हाळ्यात सेवन केल्याने पित्तप्रकोप व लहान-मोठी गळवे होण्याची शक्यता असते. लसून अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्याने जठरावर व आतड्यांमध्ये दाह निर्माण होतो. परंतु लसुन तुपात अथवा मधात मिसळून सेवन केल्याने त्याची दाहकता कमी होते. आयुर्वेदानुसार दूध व लसुन हा विरुद्ध आहार आहे. त्यामुळे दूध व लसुन यांचे सेवन करू नये. लसून रक्ताचा घट्टपणा दूर करतो. त्याच्या सेवनाने आवाज सुधारतो. दंतरोग दूर होतात.दीर्घकाळाच्या दुखण्याने किंवा  वृद्धावस्थेमुळे अशक्तपणा आल्यास थंडीत लसुन सेवन केल्याने शरीर बलवान निरोगी बनते. लसणाने बॅक्टेरिया जंतू नष्ट होतात. तसेच त्यातील अँटीसेफ्टीक घटकांमुळे श्सवननळी व फफ्फुसाचे रोग तसेच क्षयासारखे रोग बरे होतात. लसणामुळे श्वास नळीतील भरलेला कफ मोकळा होऊन बाहेर पडतो. कफाच्या आतील जंतूचाही नाश होतो.

Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा

हृदयविकार