आवळाचे फायदे
आवळा
आयुर्वेदात आवळ्यास सर्वात श्रेष्ठ मानतात. आवळा हे त्रिदोष नष्ट करणारे व एक उत्तम रसायन होय. आवळा रक्तातील अतिरिक्त उष्णता व त्याची तीव्रता कमी करतो. रक्तातील साचलेली विषद्रव्ये मळ दूर करून रक्त शुद्ध करतो. मांसधातूत प्रवेश करून मांसातील मळ जातो व पेशींना शुद्ध करतो. याप्रकारे आवळ्यांचा शरीरातील सर्व धातूंवर प्रभाव पडत असल्याने ते भरपूर रासायनिक गुण असणारे फळ आहे. आवळ्यात यौवन टिकून ठेवण्याचे गण आहेत. आवळ्यात अमृत समान गुण असल्याने त्याला अमृत फळ असे म्हणतात. आवळ्याच्या नियमित सेवनाने वृद्धत्व लवकर येत नाही. आवळ्यात सी जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असून त्यात लोह हा घटकही भरपूर असल्याने शरीरात नवीन रक्त निर्माण करण्यास आवळा अत्यंत उपयुक्त ठरतो. आवळा आंबट असल तरी त्यातील मधुरशीतल गुणामुळे त्याच्या सेवनाने पित्त न वाढता पित्तप्रकोप शांत होतो. हिरडा, बेहडा व आवळा यांचे समप्रमाणात चूर्ण एकत्र करून त्रिफळा चूर्ण बनते. त्याने कफ व पित्त दूर होते. प्रमेह, कोड बरे होतात. मलाविरोध दूर होतो.

Comments
Post a Comment