अंबा खाल्ल्याचे फायदे

                                   आंबा
              आंबा सर्व फळात श्रेष्ठ असल्याने त्याला फळांचा राजा असे म्हणतात. चांगली पिकलेली अंबे सेवन केल्याने शरीराची कांती सुंदर व तेजस्वी बनते. शरीरात रसधातू भरपूर निर्माण होऊन मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र इ. सर्व धातूंची वृद्धी होते. हिमोग्लोबिन व लाल कण वाढतात. कफ वाढत नाही. आंबे आतड्यातील उत्तम टॉनिक आहे. जठरातील पचनसंस्थेचे रोग, फुप्फुसाचे रोग व रक्त कमी असल्याने होणारे रोग नाहीसे होतात. आंब्याचे दुधाबरोबर सेवन केल्याने त्याचे गुणधर्म वाढतात. कच्ची तेरी खाल्ल्याने मंदान्गी, रक्तविकार, मलावरोध, पोटाचे विकार व नेत्र रोग होतात. पिकलेल्या आंब्यात 'ए' हे जंतुनाशक जीवनसत्वे तर 'सी' हे त्वचारोगहारक जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते

Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा

हृदयविकार