चिक्कूचे फायदे

                                चिक्कू
            चिक्कू खूप थंड पित्तशामक, पौष्टिक, गोड व रुचकर असतात. चिक्कूत ए जीवनसत्व विपुल प्रमाणात व सी जीवनसत्व थोड्या प्रमाणात असते. त्यात 14 टक्के शर्करा तसेच फॉस्फरस व लोह भरपूर प्रमाणात असते. थोड्या प्रमाणात क्षारही असतात. त्यामुळे चिक्कू आहार म्हणून फायदेशीर असतात.चिक्कूचे सेवनाने शरीरात एक प्रकारचा जोम व उत्साह संचारतो. त्यातील शर्करा रक्तात मिसळून मनुष्याला ताजेतवाने बनवते. चिक्कूच्या सेवनाने हमखास फायदा होतो. ताजे व पिकलेले चिक्कू खूप फायदेशीर असतात. कच्च्या चिक्कूमुळे मलावरोध होतो. पोटात खूप दुखते. न चावता किंवा अतिरिक्त प्रमाणात चिक्कू खाल्ल्याने पोटाला जड पडतात. चिक्कू साखरेबरोबर खाल्ल्याने धातू पुष्टी होते. तसेच लघवीची जळजळ कमी होते.

Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा

हृदयविकार