लिंबूचे फायदे

                                     लिंबू
            रक्त शुद्ध करण्याचे काम लिंबातील नैसर्गिक आंबटपणामुळे होते व शरीराचे आरोग्य रक्ताच्या शुद्धतेवरच अवलंबून असल्याने आरोग्य टिकण्यासाठी लिंबाची मदत फारच होते.
            लिंबाचा रस आंबट असून सुद्धा रक्तातील आंबटपणा दूर करण्याचा गुण त्यात असतो. तसेच तो रक्ताला क्षारांचाही पुरवठा करतो. त्यामुळेच लिंबू स्वादाने आंबट असूनही ते बहुगुणी व उपयोगी फळ होय.
              लिंबू पाचकरसांना उत्तेजित करते. जठराग्नी प्रदीप्त करते. लिंबातील सायट्रिक ऍसिड मुळे उदर कृमी नष्ट होतात. तसेच त्यांच्या रसात प्रोटीन, चरबी, नैसर्गिक मीठ, कॅल्शियम, पोटॅश, फॉस्फरस व लोह सुद्धा असते. लिंबात व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्याने रक्तपित्त स्कव्र्ही या रोगात ते अत्यंत उपयुक्त आहे. तसेच दातातून रक्त निघत असेल तर लिंबाचा उपयोग फायदेशीर ठरतो.
        लिंबाचा रस रोग व जंतुनाशक असल्याने सर्वांनीच लिंबूरस सेवन करणे हितकारक आहे. लिंबू रस सेवन करणाऱ्यास संसर्गजन्य रोग होत नाहीत. रक्तदोष व त्वचारोग मध्येही लिंबू गुणकारी आहे. लिंबातील आंबटपणा शीतलता हा गुण असल्याने उष्णतेपासून तो मनुष्याचे रक्षण करतो. उष्णतेमुळे होणारे इतर विकारातही ही ते गुणकारी ठरते. पित्त प्रकोपाने होणाऱ्या इतर विकारातही लिंबू गुणकारी आहे. लिंबू वात, पित्त व कफ प्रवृत्तीच्या लोकांसाठी तसेच शुळ असणाऱ्यांसाठी अत्यंत हितावह आहे. अनुशापोटी लिंबाच्या रसाने सेवन अधिक फायदेशीर असते. लिंबू रस पिल्याने घशाचा त्रास दूर होतो. लिंबाचा रस बोटावर घेऊन हिरड्यावर घासल्याने दातातून निघणारे रक्त बंद होते. लिंबू रस डोक्याला लावून डोके चांगले घासून धुतल्याने केसातील मळ नाहीसा होऊन केस स्वच्छ होतात. तसेच ते मऊ बनतात. अंघोळीच्या पाण्यात लिंबू पिळून अंघोळ केल्याने त्वचा मुलायम व चमकदार बनते.
         यकृत दुर्बल असणाऱ्यांनी लिंबाचे सेवन करू नये. अन्यथा त्यांचे हात पाय ताणले जातात. व अशक्तपणा जास्त जाणवतो.


Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा

हृदयविकार