पेरू खाण्याचे फायदे

                                  पेरू
               पेरू हे सात्विक व बुद्धी वर्धक फळ असून त्यामध्ये इतर फळांपेक्षा सी जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. तसेच त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, ग्लुकोज, टॅनिन ॲसिड इ. शरीराला आवश्यक घटक असल्याने दुपारी जेवल्यानंतर एक दोन तासानंतर एक मोठा पेरू खाणे अत्यंत फायदेशीर असते. पेरूतील जीवनसत्वे सी व इतर घटकांमुळे दंतरोग, दुर्बल पचनसंस्था, रक्तदाब, रक्तविकार इ. विकार नाहीसे होतात. तसेच त्यात पित्तशामक गुण असल्याने अत्यंत उपयोगी फळ आहे. पेरूच्या फोडीवर मिरपूड घातल्याने त्याचा वातूलपणा कमी होतो. पेरूच्या पानांच्या काढ्याने गुळण्या केल्याने हिजड्याची सूज व मुखविकार नाहीसे होतात.

Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा

हृदयविकार