पपईचे फायदे
पपई
पपई इतर फळांच्या तुलनेत ए जीवनसत्व अधिक प्रमाणात असते. त्यामुळे नेत्ररोग, मूत्राशय तसेच गुद्दद्वार चे रोग शारीरिक वृद्धी रोग इत्यादी रोगापासून पपई मनुष्याचे रक्षण करते. तसेच पपई सी जीवनसत्वही मुबलक असते. पपई जशी अधिक पिकेल तसे त्यातील सी जीवनसत्व वाढत जाते. पपईत सी जीवनसत्व मुबलक असल्याने त्याचे सेवनाने अस्थीरोग, दंतरोग, उच्च रक्तदाब, पक्षाघात, गाठीचा संधिवात या रोगांपासून संरक्षण होते. पपईतील कारपेन या क्षारीय द्रव्यामुळे आतड्यातील कृमी लिव्हर व प्लीहा विषयक रोग बरे होतात. पपई पोटाच्या विकारासाठी अत्यंत गुणकारी आहे. पपईमुळे पचनक्रिया सुधारते, भूकही लागते व शरीराचे कार्यशक्ती वाढते. दुसऱ्या आहार पचण्यास मदत होते, हृदय रोगासाठीही पपईचे सेवन हे उत्तम औषध आहे. प्रातर्विधी आटपून एक चमचा साखरेत कच्च्या पपईत सुई खुपसून तिचे दूध काढून पंधरा ते वीस थेंब घालून साखर घालून खाल्याने हृदयरोगात अत्यंत फायदा होतो. हृदयविकारात पेटंट औषधांपैक्षा पपईची दूध हे अत्यंत उत्तम औषध होय. पचन संस्थेचे विकार, अजीर्ण यात कच्चा पपईची भाजी किंवा कोशिंबीर खाणे फायदेशीर असते. मुलांनी नियमितपणे पपई खाल्ल्याने उंची वाढते, शरीर मजबूत व तंदुरुस्त बनते.

Comments
Post a Comment