ताकाचे फायदे

                                       ताक
 
                 आयुर्वेदानुसार 'अमृत' देवांना जसे प्रसन्नता देते तसेच पृथ्वीतलावर ताक मानवास प्रसन्नता देते. भवमिश्रांचे नुसार ताकाचे नियमितपणे सेवन करणारे व्यक्ती रोग व्याधी पासून मुक्त राहते. तसेच जे रोग बरे झालेले आहेत ते ताक सेवनाने परत उद्भवत नाही अशा प्रकारे ताकामध्ये मौलिक गुणधर्म आहेत. ज्या लोकांना दूध आवडत नाही अथवा पचत नाही अशा लोकांसाठी ताक अत्यंत गुणकारी होय.
          ताकामुळे जठराग्नी प्रदिप्त होऊन पचनव्यवस्था कार्यक्षम बनते. त्यामुळे जेवल्यानंतर ताक पिल्याने अन्नाचे चांगल्याप्रकारे पचन होते. त्यामुळे पचन व्यवस्था सुधारते. शरीरातील आंतरिक विषारी घटक नष्ट होतात. हृदय मजबूत बनते. रक्त शुद्ध होते. शरीराचा वर्ण व कांती तेजस्वी होते. वृद्धावस्था उशिरा येते. चेहर्‍यावर सुरकुत्या पडत नाहीत. सुरकुत्या पडल्यास त्या दूर होतात. ताक वायुनाशक आहे. तसेच ते कफशोषक असते. त्यामुळे ताकद स्थूल लोकांसाठीसुद्धा उपयुक्त आहे. ताक मेद / चरबी कमी करते.
             आपण जो आहार घेतो त्यातून पोषणासाठी लागणारा रस, तसाच पडून राहतो त्याला असे म्हणतात. यामुळे अनेक व्याधी निर्माण होतात. ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे आमदोष (ॲसिडिटी) दूर करणे होय. ज्यांना भूक लागत नसेल, अन्न पचत नसेल, आंबट ढेकर येत असतील, जीव घाबरा होत असेल अशा व्यक्तींसाठी ताक अमृतासमान आहे.कफ वाढला असता, सुंठ, मिरी व पिंपळी घातलेले ताक, वायुरोगात सुंठ घातलेले आंबट ताक व पित्तावर साखर घातलेले गोड ताक गुणकारी असते. ताकाने रोज चेहरा धुतल्याने तोंडावरचा काळेपणा, मुरुमाचे डाग, चिकटपणा दूर होतो. चेहरा तेजस्वी व आकर्षक बनतो. ताकात 'सी'जीवनसत्व असल्याने शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. व त्वचेचे आरोग्य आणि सौंदर्य टिकून राहते.
                 ज्या ताकातील लोणी संपूर्ण काढलेले असते ते ताक आरोग्यदायक व हलके असते. ज्या ताकातील लोण्याचा थोडासा भाग काढलेला असतो ते ताक जड व कफकारक असते. तसेच ज्या ताकातून लोणी काढलेले नसेल ते ताक जड पौष्टीक व कफवर्धक असते.शरीरात कुठे जखम झाली असेल तर, सूज आली असेल, शरीर सुकून दुर्बल झाले असेल, कृष्ण रोग झाला असेल तर अशा व्यक्तींनी ताकाचे सेवन करू नये. अन्यथा त्यांना इतर व्याधी होण्याची शक्यता असते.

Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा

हृदयविकार