टोमॅटो खाण्याचे फायदे
टोमॅटो
टोमॅटो हे अतिशय महत्त्वाचे उपयुक्त फळ आहे.शरीर संवर्धनास लागणारे मुख्य लोह व दुसरे क्षार टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात असल्याने त्यात रक्त निर्माण करण्याची इतरपेक्षा अनेक पटीनेमो जास्त असते. टोमॅटोमध्ये सहा प्रकारच्या जीवनसत्व पैकी पाच जीवनसत्वे असतात. पिकलेल्या टोमॅटोत एक,बी,सी जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळेच रोज एक ते दोन पिकलेल्या टोमॅटोची सेवन केल्याने डॉक्टरची गरज निर्माण होत नाही. लहान मुलांना पिकलेल्या टोमॅटोचा रस दिवसातून दोन ते तीन वेळा प्यायला दिल्याने मुले निरोगी, बलवान व धष्टपुष्ट बनतात. सकाळ संध्याकाळ टोमॅटोचा रस सेवन केल्याने जठराग्नी प्रदीप्त होतो. पचनशक्ती वाढते. मुळव्याध, पांडुरोग, मलावरोध नाहीसा होतो. ठिसूळ झालेल्या हिरड्यातून येणारे रक्त बंद होते. त्वचेवर लहान पुरळ उठणे, लाल डाग पडणे, कंड सुटणे इ. रक्त विकार दूर होतात. दृष्टी स्वच्छ होते व दृष्टीचे तेज वाढते. टोमॅटो जरी गुणकारी असले तरी मुतखडा, सूज, संधिवात, आमवात, आम्लपित्त, शीतपित्त (एलर्जी) शरीरात अतिरिक्त उष्णता, जुलाब तसेच आंबट पदार्थ खाल्ल्याने त्रास होत असेल अशांनी टोमॅटो सेवन करू नये.

Comments
Post a Comment