दुधाचे फायदे

                                  दूध
              दूध हे धातुवर्धक व बलकारक असल्याने दुधासारखे त्रैलोक्यात दुसरे औषध नाही. दुधाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर निरोगी बनते. तसेच दुधामध्ये सी जीवनसत्व शिवाय शरीराला आवश्यक असणारे सर्वच पोषक घटक व जीवनसत्त्वे आहेत. दूध हे जीवनदायी रसायन असल्याने त्याला 'अमृत' म्हटले जाते.
            सर्व प्रकारच्या दुधामध्ये गाईचे दूध सर्वोत्तम होय. गाईचे दूध औषधी व आरोग्यदायी असून अनेक रोगांमध्ये ते उपयुक्त असते. साधारणत: सर्वांनीच दूध घेणे आवश्यक आहे. तथापि ज्यांना गॅस होतो व ज्यांची पचनशक्ती क्षीण आहे अशांनी दुधात सुंठ, वेलची, पिंपळी अशा पाचक पदार्थाचा मसाला दुधात टाकून दूध उकळून प्यावे. लहान मुलांना अथवा पचनशक्‍ती कमकुवत असणाऱ्यांना दूध देताना त्यात तीन भाग पाणी घालून गरम करूनच घ्यावे.
             साखर घातलेले दुधाने कफ वाढतो ते वायुनाशक असते. खडीसाखर घातलेले दूध वीर्यनाशक तसेच त्यात वात, पित्त व कफ असे  त्रिदोषनाशक असते. सकाळी पिलेले दुध वीर्यवर्धक, पुष्टीकारक व जठराग्नी प्रदीप्त करणारे असते. दुपारी पिलेले दुध बलकारक व कफ आणि पित्त नाशक असते वजन प्रदीप्त करते. रात्री पिलेले दुध बुद्धिवर्धक, क्षयनाशक, आरोग्यकारक व अनेक दोष दूर करणारे असते. चिंता करणाऱ्या व्यक्तींना मन शांतीसाठी रात्री दूध पिणे गरजेचे आहे.
           गरम दुध पिल्याने कफ व वायू दूर होतो. तसेच श्रम करून आलेला थकवा दूर होतो. तर गरम करून गार झालेले दूध पिल्याने पित्त नाहीसे होते. म्हशीच्या दुधाने झोप चांगले येते. गाईचे दूध लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत हितावह असते. बकरीचे दुधाने ताप, खोकला व अतिसार दूर होतो. मेंढीच्या दुधाने उष्णता व मुतखडा दूर होतो. गाढविणीचे दूध बलवर्धक तसेच डांग्या खोकल्यावर फारच गुणकारी असते.
           फ्रिजमध्ये ठेवलेले दूध किंवा शिळे दूध पचण्यास जड होते. तसेच त्यातील पोषक घटकांचा शरीरास योग्य फायदा होत नाही. दुधाबरोबर आवळा, साखर, सुंठ, आल्ले घेतलेले चालते. मात्र दुधाबरोबर मूग, कांदा, लसूण, मुळा हे पदार्थ घेतल्यास बाधक ठरतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने दूध व केळी हेसुद्धा विरुद्ध आहार आहेत.

Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा

हृदयविकार