खजुराचे फायदे
खजूर
खजूर अति पौष्टिक, बलवर्धक, शक्तिवर्धक असून तो धातू वृद्धी करतो. तसेच खजुरात ए, बी,ही जीवनसत्वे पुष्कळ प्रमाणात तसेच लोह कॅल्शियम तांबे फॉस्फरस असल्याने तो एक पौष्टिक आहार मानला जातो. खजुरातील 'ए'जीवनसत्वामुळे शरीरातील अवयवांचा चांगला विकास होतो. बी जीवनसत्वामुळे हृदय, इंद्रिये, शरीर सुदृढ बनते. पचनसंस्था मजबूत बनून भूक चांगली लागते. शरीर व आतड्यातील मांसपेशी सशक्त बनतात. खजूर आतडी व शरीर स्वच्छ ठेवण्याचे कार्य करतो. त्यातील सी जीवनसत्वामुळे शरीरातील प्रतिकारक शक्ती चांगली बनल्याने बाहेरील कोणत्याही ही विषारी जंतूचा शरीरावर परिणाम होत नाही. व जंतू शरीरात प्रवेशही करू शकत नाहीत. अशक्तपणा घालवण्यासाठी, वजन वाढण्यासाठी, खजूर दुधात उकळून खाल्ल्याने फायदा होतो. एक वर्षापर्यंत मुलास एक खजूर २ ते ५ वर्षापर्यंत २ ते ४,५ ते १६ वर्षापर्यंत १० ते १६ वर्षानंतर च्या सर्वांना १५ ते १६ खजूर सेवन करण्याचे प्रमाण आहे.अर्थात आपणास पचेल त्याप्रमाणे प्रमाण ठेवावे.

Comments
Post a Comment