संत्र्याचे फायदे
संत्री
संत्री शरीरातील अतिरिक्त उष्णता दूर करणारी रक्तवर्धक व रक्त सुधारणांसाठी असतात.संत्रीच्या सेवनाने जठराचा व आतड्याचा मार्ग स्वच्छ होऊन दोन्ही अवयवांची पचनशक्ती वाढते. तापामध्ये व उन्हाळ्यात संत्र्या सारखी तहान भागवणारे दुसरे फळ नाही.
संत्र्यात सी जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असते. तसेच लोह व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्याने वजन वाढते. रक्तातील फिकटपणा दूर होतो. रक्त लाल रंगाचे होते. रक्त वृद्धी होते. दात व हाडे मजबूत बनतात. संत्र्यात फॉस्फरस व खनिज द्रव्येही असतात. संत्री संधिवातासारख्या रोगावर रामबाण समजले जातात. हाता पायात कळा, सांधे दुखणे यात फायदा होतो. संत्रामुळे खडबडीत व काळा पडलेल्या त्वचेत चेतना येते. त्वचा मऊ व मुलायम बनते.संत्रीतील जास्त प्रमाणात असलेल्या खनिज क्षारामुळे शरीरातील आम्लता कमी होते. संत्र्यामुळे लघवीचा पिवळेपणा व दाह दूर होतो. डोळ्यातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन डोळ्यांना शीतलता येते. उन्हाळ्यात उष्णतेने होणारी बेचैनी दूर होते. मेंदू शांत होतो. भोजनानंतर संत्री सेवन केल्याने काहीही विकार होत नाहीत. संत्र्याच्या निमित्त सेवकांचे जठर, आतडी, मूत्रपिंड इ. अवयव शुद्ध होतात. पोटातील वायू दूर होतो. रक्ताचा उच्चदाब कमी होतो. चक्कर येणे बंद होते. शरीरातील अति तीव्र उष्णता दूर होते. तसेच इतर त्वचारोग बरे होतात.

Comments
Post a Comment