दहीचे फायदे
दही
दुधात विरजण घालून दही बनते. ते रुचकर व अग्निदीपक असल्याने ते दुधापेक्षा ही गुणकारी असते. जास्त आंबट नसलेलं चांगले व मधुर दही उत्तम असते. आंबट दही हे रक्त दूषित करणारे तसेच वायू व पित्त निर्माण करणार असते.
नुसते दही खाण्यापेक्षा त्यात मध घालून खाल्ल्याने डोळ्यात चिकट स्त्राव होत नाही. किंवा डोळे चिकटत नाहीत. मुगाच्या डाळीबरोबर दही घेतल्याने वातघ्न गुणांची वृद्धी होऊन कफ वृद्धी कमी होते. आवळा चूर्ण बरोबर दही घेतल्याने रक्त व पित्ताची रोग होत नाहीत. त्यामुळे नुसते दही खाण्यापेक्षा त्यात साखर, गूळ, मध किंवा तूप घालून सेवन करावे. किंवा मुगा बरोबर किंवा तुरीच्या वरणाबरोबर सेवन करावे.
दही खाण्याचे प्रमाण दोन ते तीन तोळे एवढीच आहे. साखरेबरोबर दही खाल्ल्याने त्यातील पाच शक्ती वाढते. तसेच ते पित्तनाशक, तृषाशामक, रक्तदोष, व दाहनाशक असते. सर्व दह्यात गाईचे दही हे अधिक गुणकारी असते. रात्री दही खाऊ नये. खायचेच असेल तर तूप, साखर, मध इ. घालून ते खावे. क्षयरोग किंवा तीव्र सर्दी असणाऱ्यांनी दह्याचा उपयोग टाळणे हितावह होईल.

Comments
Post a Comment