गाजराचे फायदे

                           गाजर
        गाजर ही मानवास निसर्गाकडून मिळालेली अनमोल भेट आहे. गाजर फळ आहे व भाजी ही आहे. महागड्या फळांपेक्षा व भाज्यापेक्षा शक्तीचे भांडार असणारे स्वस्त गाजरे शरीरासाठी उत्तम शरीर वर्धक आहे. ताजी गाजरे खाल्ल्याने शरीरास त्याचा लाभ होतो.गाजराची कोशिंबीर किंवा त्याच्या बारीक तुकड्यावर मीठ, हळद, धने, जिरे घालून खाल्ल्याने त्यातील पोस्टीक घटकांचा जास्त होतो. गाजरात ए एजीवनसत्व विपुल प्रमाणात असते. गाजराचे सेवनाने शरीर मुलायम व सुंदर बनते. शरीरात शक्ती निर्माण होते वजन वाढते. शारीरिक व बौद्धिक विकास होतो. गाजर पोट व आतड्यावरील रोगावर रामबाण औषध आहे. गाजरातील लोहामुळे रक्त वाढते. गाजरातील गंधकयुक्त घटकामुळे रक्तशुद्धी होते. तसेच कंड सुटणे, नायटा, फोड येणे त्वचा विकारात फायदा होतो. गाजराच्या मोसमात सर्वांनीच मुबलक उपयोग करावा. गाजर खाऊन त्यावर पाणी पिल्याने खोकला लागतो. गाजर जास्त खाल्ल्याने पोट दुखू लागले तर गुळ खावावा.

Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा

हृदयविकार