नारळाचे फायदे
नारळ
ओल्या खोबऱ्यात कॅलरीज कार्बोहायड्रेट व खनिज क्षार पुष्कळ प्रमाणात असतात. तसेच त्यात जीवनसत्वे व सर्व आरोग्यदायक घटक मुबलक प्रमाणात असतात. तथापि त्याचे प्रमाण सुक्या खोबऱ्यात कमी असते. त्यामुळे ओले खोबरे हे हे मनुष्याला धष्टपुष्ट बनविणारे अत्यंत उपयुक्त फळ आहे. लहान मुलांना गूळ किंवा साखरेबरोबर खोबरे खायला दिल्याने त्यांचे शरीरात चरबी वाढते व शरीर धष्टपुष्ट बनते. साधारण नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने कृश शरीर असणाऱ्या तरुणांनी सकाळी खोबरे व गुळ चावून खाल्ल्याने त्यांच्या हाडांची वाढ होते. छाती भरदार होते व शरीर धष्टपुष्ट बनते नारळ पचण्यास जड, थंड, मूत्राशय स्वच्छ ठेवणाऱ्या, जुलाब विरोधक, बलदायक, पित्त, रक्तदोष व दाह दूर करणारा आहे. हृदय रोग असणाऱ्यांना नारळ आरोग्यदायक आहे.

Comments
Post a Comment