द्राक्षाचे फायदे

                               द्राक्ष
             निसर्गाने मानवास दिलेला द्राक्ष हा उत्तम प्रकारचा मेवा आहे. द्राक्ष ही लहान मुले, तरुण, वृद्ध अशा सर्वांनाच सर्व व्याधींमध्ये फायदेशीर व गुणकारी असतात. द्राक्षाच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त उष्णता दूर होते. रक्त शुद्ध होते. पित्तप्रकोप शांत होतो. द्राक्षातील सी जीवनसत्वामुळे त्वचारोग बरे होतात. द्राक्षाचे सेवनाने शरीरात स्फूर्ती व उत्साह संचारत शरीर स्वस्थ निरोगी व बलवान बनते. द्राक्षात ए, बी, सी जीवनसत्वे तसेच लोह व शरीरात शक्ती निर्माण करणारे घटक असतात. याशिवाय पोटॅशियम सेल्युलोज, शर्करा, कार्बनिक आम्ल असल्याने द्राक्षाच्या सेवनाने मलावरोध नाहीसा होतो. पौष्टिकतेच्या दृष्टीने इतर कोणत्या ही फळांपेक्षा द्राक्ष अत्यंत उत्तम आहेत. द्राक्ष व साखर एकत्र तोंडात ठेवून चघळल्याने खोकला बरा होतो. आंबट किंवा कच्ची द्राक्षे खाऊ नयेत.

Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा

हृदयविकार