मुळव्याध जुनाट बद्धकोष्टता व आतड्यातील बिघाड यामुळे मुळव्याध होतो. उपचार:- १) रोज एक ग्लास ताक सुंठ पुड घालून प्यावे. २) 100 ग्रॅम किसलेला मुळा व एक चमचा मध एकत्र करून दिवसातून दोनदा हे मिश्रण खावे. ३) जांभळाच्या हंगामात रोज मीठ लावून जांभळे खावीत. त्यामुळे मूळव्याध कायमची बरी होऊन त्याला आयुष्यभर त्रास होत नाही.४) तीन कप पाण्यात वीस ग्रॅम तीळ घालून ते पाणी उकळून एक कप करावे व त्यात लोणी घालून रोग्याला खायला द्यावे. ५) तुळस बी चूर्ण दहा ग्रॅम पाण्याबरोबर सकाळ-संध्याकाळ घ्यावे.
मुतखडा मुतखडा शरीरातील 'अ' जीवनसत्वाच्या अभाव व गरजेपेक्षा अधिक प्रमाणात 'ड' जीवनसत्व पोटात जाणे तसेच पाणी किंवा इतर द्रव्य पदार्थ कमी प्यायल्याने मूतखडे होतात. लक्षणे:- पाठ, ओटीपोट, वृषण मांड्या याा ठिकाणी तीव्र वेदना होतात. सतत लघवी ची इच्छा होते. लघवी करतानाा दुखणे तसेच लघवी थोडी थोडी होते. मळमळ, उलट्या, घाम येणे, अंग गार पडणे, लक्षणे दिसू लागतात. उपचार:- १) एका लिंबाच्या रसात थोडे सैंधव (खाणीतील मीठ) घालून बरेच दिवस नियमितपणे पिल्याने मुतखडा विरघळून जातो. २) रोज किमान चार लिटर पाणी प्यावे त्यामुळे क्षार एकत्र साचून त्याचे खडे होत नाहीत. ३) रोज तुळशीच्या पानांचा रस एक चमचा व तेवढाच मध एकत्र करून सहा महिने रोज प्यावा. मुतखडा आपोआप पडून जातो. मुत्राशयाचेे ताकत तुळशीमुळे वाढते. ४) शेवग्याच्या मुळांच्या काढ्यात सोडा घालूून प्यावा किंवा नुसता काढा घेतल्यानेही मुतख...
हृदयविकार रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने श्वास अडकल्या सारखा होतो. छातीत कळ येते व ते खांद्यापर्यंत जाते. छातीत धडधडते, चक्कर येते, मानसिक अस्वस्थता वाढते, खूप घाम येतो, थकवा जाणवतो. उपचार:- १) काही दिवस द्राक्षषे खाल्ल्याने किंवा त्याचा रस पिल्याने हृदयविकार नियंत्रणात येतो. २) रोज एक सफरचंद व एक मध्यम आकाराचा आवळा खावा. ३) कच्च्या कांद्याचा रस एक चमचा प्यावा. ४) जेवणानंतर रोज एक चमचा मध खावा त्यामुळे हृदयाची स्थिती सुधारून रक्ताभिसरण चांगले होते व हृदयातील वेदना व धडधड कमी होते. ५) हिरव्या पालेभाज्या कोबी, संत्री, मोसंबी, लिंबूू यांचे सेवन करावे. पथ्य:- आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे. मैद्याचे पदार्थ, मिठाई, शीतपेये, मांसाहारी पदार्थ, लोणी, साय टाळावी. चहा, कॉफी, मद्य, तंबाखू वर्ज करावा.
Comments
Post a Comment