मधुमेह
मधुमेह
अनियंत्रित खाणे व लठ्ठपणा या कारणामुळे मधुमेह होतो.
लक्षणे- दिवसा गुंगी येणे, रात्री झोप न लागणे, पोटऱ्या दुखणे, सारखी भूक लागणे, सारखी लघवी लागणे इ
उपचार:- १) गव्हाचा तृणरस रोज घ्यावा. २) अनुशापोटी चार तेेेे पाच कारल्याचा रस प्यावा. तसेच कारल्याचेे तुकडे पाण्यात उकळून त्याचा काढा करून प्यावा. ३) एक चमचा आवळ्याचा रस व एक कप कारल्याचाा रस एकत्र करून दोन महिने रस प्यावा. इन्सुलिन स्त्रवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. ४) जांभळाच्या बिया वाळवून त्याची पूड एक चमचा दिवसातून दोनदा एक कप दुधातून किंवा पाण्यातून घ्यावी. ५) 25 ग्रॅम ते 100 ग्रॅम मेथ्या चावून खाव्यात. ६) हरभरे भिजत घातलेले पाणी पिल्याने रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत सुधारणा होते.
आहार:- नैसर्गिक रूपातील पदार्थ आहारात जास्त असावेत. फळे, सुकामेवा, भाज्या, दूध, दही, ताक हे पदार्थ भरपूर खावेत.

Comments
Post a Comment