दमा

                               दमा


उपचार:- १) भोपळ्याच्या मुळाचे चूर्ण व सुंठ दिवसातून अर्धा अर्धा चमचा दोन ते तीन वेळा दीर्घकाळपर्यंत घेतल्याने दमा नाहीसा होतो. २) अंघोळीच्या वेळी अंगावर पाणी घेण्यापूर्वी तोंडात दोन घोट पाणी भरून घ्यावे. व आंघोळ पूर्ण होईपर्यंत तसेच ठेवावे. अंघोळ पूर्ण झालेवर थुंकावे. ३) एक वर्षापूर्वीचा जुना मध एक कप पाण्यात किंवा दुधात मिसळून प्यावा. मधामध्ये फुफ्फुसांच्या आवरणातील दोष कमी होऊन चिकट पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया थांबते. ४) एक पेला लिंबूपाणी जेवणाबरोबर प्यायल्याने दम्याची तीव्रता कमी होते. ५) एक चमचा ओवा पेलाभर ताकात मिसळून दिवसातून 22 असे ताक प्यावे. दाटलेला कफ बाहेर पडतो. ६) नुकताच सुरू झालेल्या दम्यासाठी दहा चमचे दुधात लसणीच्या पाकळ्या घालून उकळावे. व रोज एकदा प्यावे. ७) दम्याची उबळ आल्यास मोहरीच्या तेलात दोन-तीन खापराचे तुकडे घालून ते मिश्रण छातीस चोळल्याने छातीतील कफ सुटतो. रोग्याला श्वासोच्छवासाचा त्रास होत नाही. ८) मीठ वर्ज केल्याने दमा दूर होतो.
पथ्य:- भात, साखर, मसूर व दही हे कफ निर्माण करणारे पदार्थ टाळावेत. तसेच तळलेले पदार्थ, कडक चहा, कॉफी, मसालेदार पदार्थ, लोणची, मध्य व निकस पदार्थ खाऊ नयेत.

Comments

Popular posts from this blog

मुळव्याध

मुतखडा

हृदयविकार